🎯 इंटर कॉलिजिएट आर्चरी स्पर्धेत स्नेहा सिंग यशस्वी, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी चॅम्पियनशिपसाठी निवड

पद्मश्री सिंधूबाई तिरंदाजी केंद्र येथे दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित इंटर कॉलिजिएट आर्चरी स्पर्धेत College of Science (B.Sc.IT, B.Sc.Computer Science), Sawarde महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्नेहा सिंग हिने 🏹 कंपाऊंड धनुष्य प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला.

या भक्कम प्रदर्शनाच्या जोरावर तिची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी चॅम्पियनशिप 2025-26 साठी निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा दिनांक 23 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान गुरु काशी युनिव्हर्सिटी, भटिंडा (पंजाब) येथे पार पडणार आहे.

🏆 ही निवड केवळ आमच्या महाविद्यालयासाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. संस्थेच्या वतीने स्नेहा सिंग हिला हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना करण्यात येत आहेत.